संस्कृती

🚩शिवचरित्र भाग : १०४🚩 ” शिव” राज्याभिषेकाची घोषणा

आता शिवाजीराजांचा दबदबा खूप वाढला होता. मोगल, पोर्तुगीज, आदिलशहा, फ्रेंच, इंग्रज सारे सत्ताधीश शिवरायांसोबत स्वतंत्र सत्ताधीश म्हणून वागू लागले होते. स्वराज्याची राजधानी होती, स्वतंत्र भगवा-राजमुद्रा होती.  पण अधिकृत राजा नव्हता. रयतेला अधिकृत राजा हवा होता. राजमाता जिजाऊंनी रयतेच्या मनाचा कल लक्षात घेऊन राज्याभिषेकाची हीच वेळ योग्य असल्याचे मत शिवरायांजवळ व्यक्त केले. भारतात हजारो वर्षांपासून राजा झाला नव्हता म्हणून राज्याभिषेक विधी कोणालाच माहीत नव्हता. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक थाटामाटात व विधीवतच व्हावा ही रयतेची इच्छा होती. शिवरायांनी लोकेच्छेचा आदर करत राज्यभिषेकाची घोषणा केली. शंभूराजेंना राज्याभिषेकाची पूर्ण जबाबदारी देण्यात आली. विशेष दूतांमार्फत दक्षिणेत व्यंकोजी राजेंना लखोटा पाठवून तयारीसह येण्याचे शिवरायांनी आमंत्रण दिले.*


               भारताला राष्ट्र म्हणून जगमान्यता देणारा मध्ययुगीन इतिहासातील एकमेव राष्ट्राभिमानी ऐतिहासिक राजकीय प्रसंग म्हणजे “शिवराज्याभिषेक “!  त्यामुळेच भारताचा उल्लेख “शिवराष्ट्र” असा केला जातो. इंग्रजांनी भारतावर राज्य करण्यासाठी सैन्यदलाची स्थापना केली. भारतीयांना आकर्षित करण्यासाठी व लढताना स्फुरण येण्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरले. इंग्रजी सैन्यात भरती होणाऱ्या प्रत्येकाला एक शपथ घ्यावी लागत असे. त्या शपथेची सुरुवात अशी असायची ,”मी (नाव) छत्रपती शिवरायांचा पुत्र अशी शपथ घेतो की …….. …… …… ….. ….. …… ……. इंग्रजांनी इ. स. १८५८मध्ये सुरू केलेली ही शपथ इ.स. १९६४ पर्यंत स्वतंत्र भारताच्या सर्व सैन्यदलात वापरात होती. नंतर “शिवराय” या शब्दाची जागा “भारत” या शब्दाने घेतली. “भारत” या राष्ट्रासाठी “शिवराय” या नावाचा पर्याय देणारा एकमेव प्रसंग म्हणजे “राज्याभिषेक* “.


                   शिवाजीराजांनी कायदेशीर राजा होण्यासाठी विधिवत राज्याभिषेक विधी करण्याचे जाहीर केले. रयतेत आनंदोत्सव सुरू झाला. मोगल, आदिलशहा, सिद्दी, इंग्रज, डच, पोर्तुगीज , फ्रेंच , राजपूत, जाट या सर्व लहानमोठ्या सत्ताधीशांना शिवराज्याभिषेकाची बातमी मिळताच सर्वांनी आपापले दूत पाठवून शिवाजीराजांचे अभिनंदन करण्यास  सुरुवात केली.


                  मोगल बादशहा औरंगजेब याला शिवरायांच्या राज्याभिषेकाबद्दल जेव्हा समजले तेव्हा त्याच्या अंगाचा तीळपापड झाला. ज्याला आपण “पहाड का चुहा ” म्हणायचो, त्याने आज माझे सिंहासन जणू खिळखिळे करून टाकले आहे. औरंगजेबाने भर दरबारात आपल्या सरदार व शहजादाजवळ शिवरायांची महती कथन करतांना म्हटले , “यह सब फ़िज़ूल है शहज़ादे ! चंगेज और तैमुरके ख़ून ने कभी शिकस्त नही देखी | मगर तंजोर से लेकर कंदहार तक सारे हिन्दुस्तान को मोगली सल्तनत में शामिल करने का ख़्वाब देखनेवाली हमारी आँखे आज क्या देख रही है ? शिवाजी हमारी नज़रों के सामने हमारे सल्तनत की तामिर कर चुका है | लाखों के फौजों के सुभेदारो को शिकस्त देकर उसने उढेलके रख दिया है | यह हमारे मामुजान शायिस्तेखा को देखो | बडी शर्मनाक बात है शहजादे , शिवाजीराजाने इनके लाल महेलपर छापा डालकर इनके छक्के छुडा दिए | यह तो तक़दीर के बडे सिकन्दर थे इसलिए इनकी जान बच गयी | सिर्फ तीनों उंगलीयोपर इन्हें समझौता करना पडा | यह सुरत के खूबसुरत इनायतखान बहाद्दर , शिवाजी जब सुरत में आया तो दुम दबाके भाग गए | यह जोधपूर के महाराज जसवंतसिंह राठोड , मऱ्हाठो के तलवारों के वार अपने छाती पर नही बल्की पीठ पर खाएं | यह हाबशी फौलादखान , इनकी हथेली पर मिठाई रखकर शिवाजी आग्रा के कैदखाने से फरार हो गया | मेरे सभी मनसुबो को ख़ाक में मिला दिया इस फौलादखानने ! लष्कर के साथ मैदान छोड़ने वाले यह करतलबखान , खाजहा बहाद्दर , रणमस्तखान , केशरसिंह , मुनावरखान , तमाम राजपूत और पठाण इन सबको शिवाजी ने शिकस्त दी | एक बात कहूं शहजादे , शायद आप कभी समझ नही पाओगे | औरत, गाना , शराब , शान शिवाजीको कभी मालूम ही नही | शिवाजी ने मजबूत क़िले बनाएं , मजबूत जमीर के लोग तैयार किए | हिंदुस्तान की हर एक चीज़ हम खरीद सकते है | लेकीन मऱ्हाठो ने अपने आपकों कभी बिकने नही दिया | हमने लाखों के जहागिरो की लालच दिखायी , मगर जाबाज मऱ्हाठो ने उसपर थूक दिया | मऱ्हाठे रुकते नहीं , थकते नहीं , झुकते नहीं , बिकते नहीं | शिवाजी मगरुर है , दगाबाज है | लेकीन उसका चाल-चलन दूध की तरह साफ है | शहजादे , हम खुशनसीब है  हमे दुश्मन मिला वो भी शिवा जैसा !” आपला शत्रू जेव्हा आपलं कौतुक करतो ते आपलं सर्वात मोठं यश असतं. शत्रुलाही हेवा वाटेल असे आपले शिवाजीराजे होते.         

         शिवाजीराजे अनभिषिक्त राजे होणार होते. राज्याभिषेकानंतर शिवाजीराजांना सर्व धार्मिक व राजकीय अधिकारही मिळणार होते. शिवराज्याभिषेक झाल्यावर शिवाजीराजे “छत्रपती “होणार होते. सार्वभौम राजा होणार होते.  “शिवस्वराज्याचा ” कल्याणकारी कायदा येणार होता. म्हणून शिवरायांसोबत वीस- वीस , पंचवीस – पंचवीस वर्षे राज्यकारभार सांभाळणारे ब्राह्मण कारकून, चिटणीस, कारभारी, मंत्री सारे शिवरायांविरुद्ध उभे ठाकले आणि ” धर्म बुडाला … धर्म बुडाला…” अशा बोंबा मारू लागले. शिवराज्याभिषेकावर त्यांनी सामूहिक बहिष्कार टाकून कोणताही ब्राम्हण शिवराज्याभिषेक करण्यासाठी येणार नाही असा निर्णय त्यांनी जाहीर केला.


               ✍🏻लेखन: चंदन पवार

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close