पिंपरी चिंचवडपुणे

पुण्यात या वेळेत पुन्हा संचारनिर्बंध, कठोर पावले उचलत नवी नियमावली जाहीर

पुणे: राज्यात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेऊन जिल्ह्यांनुसार आता कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू झाले आहेत. अमरावती, वर्ध्यानंतर आता पुण्यातही कोरोना वाढू नये म्हणून कठोर पावलं उचलण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.

पुण्यासह ग्रामीण भागांमध्ये कोरोनासंदर्भात मोठ्या प्रमाणात जगजागृती वाढवणार आहे. याशिवाय पुणे विभागातील कोरोना हॉटस्पॉट निश्चित करून तिथे सर्वेक्षण वाढवण्यावर भर देण्यात येईल. पुण्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही कठोर निर्णय़ घेण्यात येत आहेत.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात रात्री 11 ते पहाटे सहापर्यंत पुन्हा संचारबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुण्यातील शाळा, महाविद्यालय 28 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी, पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत हा निर्णय झाला.

रात्री 11 ते सकाळी सहापर्यंत पुन्हा संचारबंदी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात रात्री 11 ते सकाळी सहापर्यंत पुन्हा संचारबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत हा निर्णय झाला.

नियमांचे पालन करुन अभ्यासिका सुरु राहणार !
शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस २८ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी अभ्यासिका सुरुच ठेवण्यात येणार आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासंदर्भातील नियमावलीची कडक अंमलबजावणी करुन ही परवानगी देण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुणे शहरासह जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुण्यात उद्यापासून रात्री विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. याशिवाय अत्यावश्यक सेवांना निर्बंधातून वगळण्यात आले आहेत.

याशिवाय भाजीपाला, दूधसेवा, पेपर सुरू राहणार आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा बंद राहणार असून कॉलेज आणि खासगी कोचिंग क्लासेसही बंद राहणार आहे. याशिवाय स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासिका 50 टक्के क्षमतेनं सुरू ठेवण्यात येणार आहे.

हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट आता रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर लग्न समारंभ, संमेलन, राजकीय रँलीत फक्त 200 लोकांची मर्यांदा असेल. या कार्यक्रमांसाठी पोलिसांची लेखी परवानगी आवश्यक असणार आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close