पुण्यात पुन्हा लॉकडाऊन? काय आहे सध्या व्हायरल होणाऱ्या या बातमीमागचे वास्तव ?……. जाणून घ्या

पुणे : राज्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. विशेषत: मुंबई, पुणे, अमरावती, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकारही अॅक्शन मोडमध्ये आहे. अमरावती, यवतमाळ, अकोला यांना कंटेनमेंट झोन जाहीर करून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करा, असे निर्देश मुख्य सचिव संजय कुमार यांनी तीन जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
मुंबई, पुणे, अमरावती, यवतमाळ, अकोला इथली कोरोनाची परिस्थिती पाहता संबंधित प्रशासनानं कठोर पावलं उचलली आहेत आणि पुन्हा नवे निर्बंध लागू केले आहेत.
दुसरीकडे पुण्यामध्ये देखील करोनाचा संसर्ग पुन्हा वाढल्याचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन होणारं असल्याचा टिव्ही 9 च्या जुन्या व्हिडिओने धुमाकूळ माजवला असल्याने नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
यावर जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी, कोणतेही लॉकडाऊन होणारं नसून ती फक्त अफवा आहे. तरी या अफवेवर कोणीही विश्र्वास ठेऊ नये असे स्पष्टीकरण दिलं आहे.
तसेच सध्या कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे तरी नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले आहे.
मागील आठवड्यात असणारा कोरोनाचा ४.६ टक्के इतका पॉझिटिव्हीटी दर आता १२.५ टक्क्यांवर पोहोचला असून उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आज तातडीने आढावा बैठक घेत विविध सूचना प्रशासनाला यापूर्वीच दिल्या आहेत.