ताज्या घडामोडी

सोनं खरेदी करणा-यांसाठी महत्त्वाची बातमी…..

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात उतार होत आहेत. भारतीय बाजारात गेल्या काही दिवसांतील सोन्याचे दर पाहता, या आठवड्यात सोन्याने भाव उतरले असल्याचं चित्र आहे.

9 महिन्यांनंतर सोनं पुन्हा 47 हजारांखाली आलं आहे. यामुळे सोने खरेदीसाठी सुवर्णसंधी आहे. सोन्याचा भाव 46 हजार 900वर आताचा आहे. आयात शुल्क कपातीपाठोपाठ डॉलरचे दरही कमी झाल्यानं सोन्याच्या दरांत घसरण पाहायला मिळाली.

लॉकडाऊन असलं तरी गेल्या वर्षी मे महिन्यात बाजारात उलाढाल होऊन सोने-चांदीचे भाव वाढत गेले. दिवाळीपर्यंत ही भाववाढ कायम होती. मात्र त्यानंतर आता सोन्याचे भाव कमी होताना पहायला मिळतायत. आयात शुल्कात कपातीपाठोपाठ आता डॉलरचे दरही कमी होऊ लागल्यानं सोनं-चांदीच्या दरात चांगलीच घसरण होत आहे.

19 फेब्रुवारीला सोन्याच्या भावात 400 रुपयांची घसरण होऊन दर 46 हजार 900 रुपयांवर आले. चांदीतही एक हजार 800 रुपयांनी घसरण होऊन ती 68 हजार 700 रुपयांवर आली. नऊ महिन्यांनंतर सोनं पुन्हा 47 हजारांच्या खाली तर सहा महिन्यांनंतर चांदी 69 हजारांच्या खाली आली आहे.

लॉकडाऊन असले तरी गेल्या वर्षी मे महिन्यात बाजारात उलाढाल होऊन सोने-चांदीचे भाव वाढत गेले. दिवाळीपर्यंत ही भाववाढ कायम राहत त्यानंतर भाव कमी-कमी होऊ लागले. आता अर्थसंकल्पात आयात शुल्कात अडीच टक्क्यांनी कपात झाली व तेव्हापासून भाव कमी होत गेले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close