पुण्यात कोरोना खबरदारीची नवी नियमावली लागू; मास्क न घातल्यास 1000 रुपये पर्यंत दंड

पुणे : मुंबईपाठोपाठ पुण्यातही कोरोनाचे रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. पुण्यातील वाढता कोरोना लक्षात घेता शहरात मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी याबाबतची नियमावली जाहीर केली आहे.
राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, औरंगाबाद यासंह अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. या गाईडलाईन्सनुसार पुणे शहरात मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. पुण्यात सलग दुसऱ्यांदा मास्क न घातलेल्या व्यक्तींकडून एक हजारांचा दंड वसूल केला जाणार आहे.
नवीन नियमावली आणि उपाययोजना 👇🏻
- मास्क वापरणे अनिवार्य, मास्क नसेल तर 500 रुपये दंड, दुसऱ्यांदा मास्क न घातल्याचे आढळल्यास 1000 रुपये दंड
- मास्क कारवाईसाठी विशेष पथकाची स्थापना
- लग्न समारंभासाठी 50 पेक्षा जास्त लोक नकोत
- धार्मिक स्थळे तसेच प्रार्थना स्थळांमध्ये गर्दी झाल्यास कारवाई
- सरकारी कार्यालयांत गर्दी टाळण्यासाठी नोडल ऑफिसची नियुक्ती
पुणे मंडळात एकूण 1165 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यात पुणे, पुणे मनपा, पिंपरी-चिंचवड मनपा, सोलापूर, सोलापूर मनपा, सातारा याचा समावेश आहे.