पुणे

मनसेच्या वतीने हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त ज्येष्ठ शिवसैनिक यांचा सन्मान

आळंदी : प्रतिनिधी |

आज हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त दिघीतील ज्येष्ठ शिवसैनिक गणपतराव रामचंद्र वाळके यांचा वारकरी पोशाख देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
पक्षप्रमुख मा .बाळासाहेब ठाकरे यांचे आचार विचार सदैव प्रत्येक शिवसैनिकात राहतील त्या माध्यमातून ते नेहमीच अजरामर राहतील.

तुमच्याकडे जर आत्मबल,आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्हाला मरण नाही
नोकरी मिळवण्यापेक्षा नोकरी देण्याऱ्याची भूमिका तुमची असली पाहिजे. मराठी माणूस स्वतःच्या व्यवसायात मोठा होऊन त्याचा ठसा जगात उमटावा नेहमीच म्हणत. तुम्ही उद्या भविष्यात वयाने म्हातारे व्हाल परंतु विचाराने म्हातारे होऊ नका.
आपल्या भाषणात असे अनेक प्रेरणादायी वाक्य सांगत त्यामुळे जीवनशैली कडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळाच…यावेळी मनसे चे आळंदी शहराध्यक्ष निलेश बाप्पू घुंडरे पाटील, रस्ते आस्थापनाचे तालुका अध्यक्ष प्रसाद बोराटे,शहराध्यक्ष तुषार (बाळू) नेटके उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close