तंत्रज्ञानमहाराष्ट्र माझा

कोविडची लस घ्यायची आहे? मग आधी मोबाईल नंबर आधारशी लिंक करा…….


गेल्या वर्षी देशात आणि जगभरात कोरोनाने चांगलाच हाहाकार माजविला होता. त्यांनंतर अवघ्या जगाचे लक्ष कोविडवरील लस कधी मिळणार याकडे लागले होते. मात्र देशात सिरमने ही लस बाजारात आणली आणि कोरोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी देशभरामध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे. कोरोनावरील लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये 3 कोटी कोरोना योद्धांना लस दिली जात आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना लसीकरण मोहिमेवर लक्ष देण्याचे आदेश दिलेत. त्यासाठी सर्व नागरिकांनी लवकरात लवकर त्यांचा मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक करण्याचे आदेश मोदी सरकाने दिले आहेत.

याचे कारण काय?


लसीकरणासाठी ‘आधार’चा पुरावा असणे खूप गरजेचे आहे. या माध्यमातून आपण पहिला आणि दुसरा डोस कधी घेतला हे कळू शकेल. हिंदू बिझनेसलाईनने दिलेल्या बातमीनुसार, जर तुम्हाला या दोन्ही लशी घ्यायच्या असतील तर प्रथम तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करावा लागेल. तसंच, ‘लस कशी, कधी आणि कोणती देण्यात आली ही माहिती डिजिटल रेकॉर्ड करण्यासाठी आधार गरजेचे आहे’ ,मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केल्यावर लसीकरणासाठी एसएमएस पाठवण्याची सुविधा उपलब्ध होईल.’असे कोविड 19 डेटा मॅनेजमेंट आणि एम्पॉवर्ड ग्रुप ऑफ टेक्नॉलॉजीचे चेअरमन आरएस शर्मा यांनी सांगितलं आहे.

हे ऍप ठेवणार नजर…..

संपूर्ण लसीकरणाच्या प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी, लसीकरणासाठी नोंदणी केलेल्या किंवा पहिला शॉर्ट घेतलेल्या लोकांवर नजर ठेवण्यासाठी, लसीकरणाच्या संग्रहावर नजर ठेवण्यासाठी सरकारने Co-Win अॅप तयार केला आहे. हे अॅप डिजिटल प्लॅटफॉर्म असून याला विनामूल्य डाऊनलोड करता येऊ शकते.

लसीकरणाची प्रक्रिया, प्रशासकिय योजना, लसीकरण कर्मचारी आणि लसीकरण करणाऱ्या लोकांसाठी Co-Win अॅप हे व्यासपीठ म्हणून कार्य करेल. या Co-Win अॅपमध्ये 5 विभाग आहेत. पहिले प्रशासकीय विभाग, दुसरे नोंदणी विभाग, तिसरे लसीकरण विभाग, चौथे लाभ मंजूरी विभाग आणि पाचवे अहवाल विभाग. Co-Win वेबसाईटवरुन पाठवलेले प्रमाणपत्र पूर्णपणे क्यूआर कोडने सुसज्ज आहे.

या प्रमाणपत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोसोबत कोरोनाला हरवण्याबाबतचा मंत्र ‘दवाई भी लिहिला आहे. क्यूआर कोड असलेले प्रमाणपत्र 28 दिवसांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोना लसीचा दुसरा डोस दिल्यानंतर दुसरे प्रमाणपत्र दिले जाईल. ज्यामध्ये लाभार्थीचा फोटो लावलेला असेल. दरम्यान, 16 जानेवारीपासून सुरु झालेल्या या लसीकरण मोहिमेमध्ये मोठ्याप्रमाणात लोकांनी सहभाग नोंदवला आहे.

साभार: आयबीएन नेटवर्क

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close