आरोग्य

दररोज 30 मिनिटे चालण्याचे 30 फायदे, पण वयानुसार चालायचं किती जाणून घ्या…..

निरोगी आरोग्यासाठी प्रत्येकाने नियमित व्यायाम करणे गरजेचे असते. व्यायाम हा चालणे, पळणे, दोरीउड्या, मैदानी खेळ, जिना चढणे, सायकलिंग, पोहणे, वजन उचलणे अशा अनेक प्रकारांनी करता येतो. यापैकी सर्वात सोपा आणि स्वस्त व्यायाम प्रकार कोणता असेल तर तो ‘चालण्याचा व्यायाम’ हा आहे.
इतर कोणत्याही व्यायामापेक्षा चालण्याचा व्यायाम हा उत्तम आणि सोपा. त्यासाठी वेगळे असे काही करावे लागत नाही. रोज जर तुम्ही 30 मिनिटे चालत असाल तर वेगळा व्यायाम करण्याची तुम्हाला गरजही नाही. यामुळे तुमचे आरोग्य नक्कीच उत्तम राहील.

दररोज 30 मिनीटे चालण्याचे हे आहेत 30 फायदे

 1. एक पैसाही खर्च न करता करता येणारा व्यायाम प्रकार
 2. सर्वांना करण्यासाठी सहज, सोपा व्यायाम प्रकार
 3. कोणत्याही प्रकारच्या साहित्याशिवाय करता येणारा व्यायाम प्रकार
 4. शरीर तंदुरुस्त, चपळ ठेवण्यासाठी एकमेव व्यायाम प्रकार
 5. सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुध्द ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो.
 6. हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्व सकाळ्च्या कोवळ्या उन्हातून मिळते.
 7. चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.
 8. सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो.
 9. चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडेपणा दूर होण्यास मदत
 10. चालण्यामुळे झोपही चांगली लागते.
 11. मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते.
 12. वजन कमी करायचे असल्यास हा व्यायामप्रकार उत्तम
 13. चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळते
 14. चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते.
 15. दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो असं संशोधनातून समोर आलंय.
 16. चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबध्दतेसारखे, पचनाचे विकार कमी होतात.
 17. झपझप चालण्यामुळे हृदयाची गती व स्टॅमिना वाढतो .
 18. नियमित चालण्याची सवय असणारयांमध्ये ह्रदयविकाराने मृत्यु येण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी असते.
 19. नियमित चालण्याने फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते.
 20. नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.
 21. नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते.
 22. हाडांची मजबूतीही चालण्यामुळे वाढते.
 23. नियमित चालण्यामुळे कंबर, मांड्या, पायाचे स्नायू मजबूत होतात
 24. मोतीबिंदुची शक्यता कमी होते.
 25. नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर पासून बचाव होतो.
 26. नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी उपयोग.
 27. चालण्यातून नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते
 28. दररोज ३० मिनीटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी वाढते.
 29. नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.
 30. कोणत्याही वयात तुम्ही हा व्यायाम करु शकता. आपण आपल्य नव्वदीतही शरीर साथ देत असेल तर चालण्याचा व्यायाम करू शकता, मात्र झेपेल इतकाच!.

वयोगटानुसार किती चालावे?

6 ते 17 वर्ष वयोगटातील लोकांनी 15000 पावलं चालायला हवं. 1200 पावलंही चालू शकता. 18 ते 40 वर्ष वयोगटातील लोकांनी 12000 पावलं चालणं उत्तम ठरेल. 50 वर्ष वय असलेल्या लोकांनी 10000 पावलं चालायला हवं. 60 वर्ष वयोगटापेक्षा जास्त वय असलेल्यांनी 8000 पावलं चालायला हवं.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close