विश्ववार्ता

जगातील सर्वाधिक शक्तिशाली राष्ट्राच्या उपाध्यक्षपदी भारतीय नारीची वर्णी, जाणून घ्या त्यांच्याबद्दल अधिक…

अमेरिकेत शपथविधी सोहळा पार पडत आहे. जो बायडेन अध्यक्षपदाची शपथ घेत असून कमला हॅरीस या पहिल्या महिला उपाध्यक्ष होत आहेत. हॅरीस या उपाध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या पहिल्या भारतीय आणि आफ्रिकनवंशीय देखील आहेत.

जाणून घेऊया भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्याबद्दल…
कमला हॅरिस या अमेरिकेच्या 49व्या उपराष्ट्राध्यक्ष आहेत. पण त्या अमेरिकेच्या पहिला महिला उप-राष्ट्राध्यक्ष आहेत. आणि सोबतच उप-राष्ट्राध्यक्षपद सांभाळणारी आशियाई वंशांची आणि आफ्रिकन – अमेरिकन वंशाची पहिली व्यक्ती म्हणूनही त्या इतिहास घडवत आहेत.

55 वर्षांच्या कमला हॅरिस या सुरुवातीला खरंतर अध्यक्षपदाच्या शर्यतीत होत्या. पण नंतर त्यांनी या शर्यतीतून माघार घेत बायडन यांना पाठिंबा दिला. त्यानंतर जो बायडन यांनी कमला हॅरिस यांची रनिंग मेट म्हणून निवड केली होती.

कमलांचा जन्म कॅलिफोर्नियातल्या ओकलंडचा. त्यांचे आईवडील दोघेही स्थलांतरित. आईचा जन्म भारतातला आणि वडिलांचा जमैकातला.

कमला लहान असतानाच त्यांचे पालक विभक्त झाले आणि त्यानंतर त्यांची आई श्यामला गोपालन हॅरिस यांनी कमला आणि माया या लेकींना वाढवलं. श्यामला या कॅन्सर संशोधक आणि नागरी हक्क कार्यकर्त्या होत्या. तर कमला यांचे वडील अर्थतज्ज्ञ आहेत.
आपल्या दोन्ही मुलींना त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीची जाणीव असेल याची काळजी श्यामला यांनी त्यांना वाढवताना घेतली.

मोठं होताना कमला यांचा कायमच त्यांच्या भारतीय मुळाशी संपर्क आला. आईसोबत त्या भारतातही येत. पण यासोबतच आईने आपल्याला आणि बहिणीला ओकलंडच्या कृष्णवर्णीय इतिहासाशीही जोडल्याचं कमला सांगतात.
आईच्या हातचा दहीभात, डाळ, इडली खाऊन मोठं झाल्याचं त्या सांगतात. त्यांच्या आत्मकथेत त्यांनी घरी भारतीय बिर्याणी बनवण्याबद्दलही लिहिलेलं आहे.
2014मध्ये कमला हॅरिस यांनी डग्लस एमहॉफ यांच्याशी लग्न केलं. त्यावेळी भारतीय परंपरेनुसार कमलांनी नवऱ्याच्या गळ्यात फुलांची वरमाला घातली तर डग्लस यांनी त्यांच्या ज्यू परंपरेनुसार काचेचा ग्लास पायाखाली फोडला.

2017 साली त्यांची निवड कॅलिफोर्नियाच्या ज्युनियर युएस सिनेटर म्हणून झाली. अमेरिकेच्या सिनेटमध्ये त्यांनी महत्त्वाच्या चर्चांदरम्यान त्यांच्या संभाषण कौशल्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली.

कमला हॅरिस यांच्या भारतीय वंशामुळे अमेरिकेतले भारतीयही त्यांच्याकडे आपल्यापैकीच एक म्हणून पाहतात. म्हणूनच कमला यांना देण्यात आलेल्या या उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या संधीकडे अमेरिकेतल्या भारतीय आणि दक्षिण आशियायी लोकांना देण्यात आलेलं प्रतिनिधित्वं म्हणूनही पाहिलं जातंय.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close