क्रिडावृत्त

भारताकडून ऑस्ट्रेलियाचा धुव्वा, भारताने कसोटी मालिका जिंकली.

ब्रिस्बेन :
भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यावर क्रीडा विश्वाचं लक्ष लागलं होतं. ब्रिस्बेनमधील गाबा मैदानात खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवित मालिका खिशात टाकली.

बॉर्डर-गावस्कर मालिकेतील अखेरच्या आणि महत्त्वाच्या अशा सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघानं नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. ज्यानंतर भारतीय गोलंदाजांनी हे आव्हान पेलत दमदार गोलंदाजीनं संघाला सुरुवात करुन दिली.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 369 धावा केल्या. तर भारताला पहिल्या डावात 336 धावांवर रोखलं. यामुळे ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 33 धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाने या आघाडी व्यतिरिक्त एकूण 294 धावा केल्या. यामुळे टीम इंडियाला 328 धावांचे आव्हान मिळाले.


मैदानात उरतलेल्या भारतीय संघाने चिवटपणे प्रतिकार करीत हे आव्हान सहज पार पाडले.
आणि 3 गडी राखून हा सामना जिंकत मालिकाही खिशात टाकली. दुसऱ्या डावातील निर्णायक पाचव्या दिवशी शुभमन गिल 91 धावा,पुजारा 56 धावा तसेच पंतने 89 धावा काढत संघाला विजय मिळवून दिला.

मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याचा पराक्रम गाजवला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close