पिंपरी चिंचवड

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त भटक्या कुटुंबाना मदत, मधुकर बच्चे युवा मंचचा स्तुत्य उपक्रम

आकुर्डी : प्रतिनिधी |

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती ,युवा दिनानिमित्त भा. ज.पा भटके विमुक्त युवा आघाडी व मधुकर बच्चे युवा मंच यांच्या वतीने आकुर्डी,गुरुद्वारा परिसरात निवाऱ्यासाठी पाल (झोपडी)ठोकून वास्तव्य करणाऱ्या गरीब व भटक्या कुटुंबाना कपडे, ब्लॅंकेट, स्वेटर,मास्क,सॅनिटांयझर,..आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले.


महाराष्ट्र महावितरण समिती सद्स्य,भाजपा पिंपरी चिंचवड शहर सचिव श्री.मधुकर बच्चे, भा.ज.पा भटके विमुक्त युवा आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री.सौरभ शिंदे, यांच्या पुढाकाराने व नागरिकांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.


मधुकर बच्चे युवा मंचच्या वतीने बाराही महिने हा उपक्रम राबविण्यात येतो. कपडे तर बाराही महिने वाटप होतात परंतु प्रत्येक ऋतूनुसार लागणाऱ्या आणखी काही वस्तू वाटण्यात येतात.
हा उपक्रम लोकसहभागातून यशस्वी सुरू आहे.

पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष:संतोष खिंवसरा ,सा. कार्यकर्ते:मारुती हाके ,अशोक शिंगाडे,अभिजित (बंटी )पवार, गणेश बच्चे ,राजू कोरे ,भाईजान खान,द्वारकानाथ कुलकर्णी, गिरीश हंपे,उत्तम गारगोटे,आदी पदाधिकारी हा उपक्रम यशस्वी चालू ठेवण्यासाठी मेहनत घेतात.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close