शहीद जवान संभाजी ज्ञानेश्वर राळे यांच्या मातोश्रींना ‘’ राजमाता जिजाऊ ‘’ पुरस्कार समर्पित

खेड :प्रतिनिधी |
खेड तालुक्याचे सुपुत्र शहीद जवान कै.संभाजी ज्ञानेश्वर राळे (फौजी ) कुरकुंडी येथे त्यांच्या कुटूंबीयांची भेट घेण्यासाठी तसेच आज राजमाता जिजाऊ ह्यांची जयंती म्हणून वीरमरण प्राप्त झालेले आपल्या भारत मातेचे सुपुत्र शहीद संभाजी ज्ञानेश्वर राळे यांच्या मातोश्री सौ.अरूणाआई ज्ञानेश्वर राळे यांना प्रसंग जरी दुःखद असला तरी स्वराज्य निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराज व अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजामाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त खेड तालुक्यांतील शहीद राळेंच्या आई आपल्या सर्वांना राजमाता जिजाऊच आहेत ह्याचेच भान ठेवून ,आज आळंदी शहरातील नागरिक तसेच आळंदी विकास युवा मंच ,श्री.स्वामी समर्थ ग्रुप तसेच सर्व आळंदीकर नागरिकांच्या वतीने ‘’ राजमाता जिजाऊ’’ पुरस्कार समर्पित करण्यात आला .त्यावेळी त्यांना ‘ ज्ञानेश्वरी ‘ व शहीद जवान संभाजी ज्ञानेश्वर राळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला.सदर प्रसंगी प्रसाद बोराटे ,सचिन सोळंकर व संदीप नाईकरे उपस्थित होते.
एकीकडे संपूर्ण देश नव वर्षाचं स्वागत आणि सणवारांच्या उत्साहात दंग होता. अशावेळी देशाचं रक्षण करणारे भारतीय लष्कराचे जवान सीमेवर शत्रूशी दोन हात करण्यासाठी सदैव सज्ज असतात. त्यातच पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील कुरकुंडी गावचे जवान संभाजी ज्ञानेश्वर राळे यांना वीरमरण प्राप्त झाले . वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी संभाजी राळे शहीद झाले. अरुणाचल प्रदेश इथं तब्येत खालावल्यामुळे त्यांना वीरमरण प्राप्त झाले होते.