पुणे

कामगारांना न्याय द्या…जनरल मोटर्स इंडिया कंपनीच्या कामगारांच्या वतीने मानव संरक्षण समितीचे खासदार सुप्रिया सुळे यांना निवेदन

पुणे : प्रतिनिधी |

जनरल मोटर्स इंडिया प्रा. लिमिटेड कंपनी, तळेगाव दाभाडे, जि. पुणे या कंपनीने 17 जानेवारी, 2020 रोजी कामगारांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता चीन देशातील ग्रेट वॉल मोटर्स, या कंपनीला विकत असल्याची घोषणा केली होती. महाराष्ट्र शासनाने जनरल मोटर्स व चीन मधील ग्रेट वॉल मोटर्स, सोबत मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत MOU केला आहे. परंतु सद्यस्थितीमध्ये केंद्र शासनाकडुून परवानगी मिळणे अडचणीचे झाल्यामुळे जनरल मोटर्स ने २० नोव्हेंबर, २०२० रोजी तळेगांव प्लांट बंद करण्यासाठी उद्योग विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडे पत्रव्यवहार केला आहे. परिणामी सदरील दोनही घटना पाहता या परस्पर विरोधी असल्यामुळे कोरोना सारख्या महामारीच्या काळामध्ये कंपनीमधील १५७८ कायमस्वरुपी असणान्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आणली आहे.

जनरल मोटर्स इंडिया प्रा. लिमीटेड कंपनी, तळेगाव दाभाडे, जि.पुणे या कंपनीतील 1578 कर्मच्याऱ्यांच्या सेवा कायम ठेवणेबाबत संबंधीतांना योग्य आदेश देणेची विनंती करण्यात आली आहे. याबाबत प्रशासनाने ठोस पावले उचलत प्रश्न सोडविण्याची अपेक्षा कामगारवर्गाकडून केली जात आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close