
आज 12 जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती. स्वामी विवेकानंद म्हणजे भारतीय इतिहासातील काही मोजक्या दैदिप्यमान पुरुषांपैकी एक! त्यांची जीवनगाथा इतकी प्रेरणादायी आहे की जीवनात सर्व काही गमावून बसलेल्या व्यक्तीला देखील त्यांच्या विचारधारेने जगण्याची नवसंजीवनी मिळावी. असे हे थोर रत्न भारताच्या नशिबी आले हे आपले सौभाग्यचं! त्यांच्या शिकवणीने तरुण पिढी आजही जागृत होते. आजही त्यांचे लाखो अनुयायी त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालत आहेत. अशा या महान विचारवंताने शिकागो धर्म परिषदेत केलेले जगप्रसिद्ध भाषण……
“अमेरिकेच्या सर्व बंधू व बहिणींनो…., आजच्या या समारंभात आपण सर्वांनी ज्या पद्धतीने माझे स्वागत केले ते पाहून माझे मन भरून आले. मी जगातील सर्वात जुनी संत परंपरा आणि सर्व धर्मांची जननी कळून तुम्हाला धन्यवाद करतो. सर्व जाती व पंथांच्या लाखो करोडो हिंदूंकडून तुमचे आभार व्यक्त करतो.
मी या रंगमंचावर बोलणाऱ्या काही वक्त्यांना देखील धन्यवाद देऊ इच्छितो, कारण त्यांनी आज हे सिद्ध केले की जगात सहनशीलता पूर्वेकडील देशांकडून पसरत आहे.
मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी त्या धर्मातून आहे ज्याने जगाला सहिष्णुता व वैश्विक स्विकृतीचा धडा शिकवला आहे. आम्ही फक्त वैश्विक सहनशीलतेवर विश्वास करीत नाही तर सर्व धर्मांना सत्य व एक मानतो.
मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी त्या देशाचा रहिवासी आहे ज्याने त्या सर्व लोकांना आश्रय दिला ज्यांना इतर सर्व देशांनी त्रास दिला. मला अभिमान आहे की आमच्या देशाने इतरांद्वारे प्रताडीत झालेल्या इस्रायली यहुदीनां आश्रय दिला.
मला अभिमान आहे की मी त्या धर्माचा नाही ज्याने पारशी लोकांना शरण दिली व अजुनही देत आहे. आजच्या या शुभमुहूर्तावर मला लहानपणी वाचलेला एक श्लोक आठवण येत आहे. या श्लोकाची करोड लोक पुनरावृत्ती करतात. स्वामी विवेकानंद यांच्या श्लोकाचा अर्थ पुढीलप्रमाणे होता. ज्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणाहून निघालेल्या नद्या एक होऊन समुद्राला मिळून जातात. त्याचपद्धतीने मनुष्य आपल्या इच्छा मधून वेगवेगळे मार्ग निवडतो जरी दिसण्यात हे मार्ग वेगवेगळे वाटत असले तरी ते सर्व ईश्वराकडे जाणारे आहेत.
सांप्रदायिकता, कट्टरता आणि धार्मिक हठाने दीर्घ काळापासून या धरतीला जकडून ठेवले आहे. ज्यामुळे आपली धरती हिंसा व रक्ताने लाल झाली आहे. धार्मिक कट्टरतेमुळे कितीतरी सभ्यता व देश नष्ट झाले आहेत.
जर कट्टरता पसरवणारे हे राक्षस आजच्या समाजात नसते तर तर मानव समाज कितीतरी चांगला राहिला असता. परंतु आता ही कट्टरता अधिक वेळ राहणार नाही. मला आशा आहे की या संमेलनाचे बिगुल सर्व तऱ्हेची कट्टरता, धार्मिक हठ आणि दुःखाचा विनाश करेल. मग ते तलवाराने असो वा पेनाने……”
हेच ते स्वामी विवेकानंद यांचे जगप्रसिद्ध भाषण ज्याने संपूर्ण जगाला हिंदू धर्माच्या पवित्र्याची आणि मौलिकतेची महती पटवून दिली.
- सागर ननावरे