भारत

विराट अनुष्काच्या घरी कन्यारत्न, इंस्टाग्राम द्वारे विराटची माहिती

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्या घरी मुलीचे आगमन झालं आहे. आज दुपारी ही गोड बातमी खुद्द विराटने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. त्यानंतर अनुष्का आणि विराटवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विराटने शेअर केलेल्या पोस्टला आतापर्यंत 26 हजार पेक्षा जास्त चाहत्यांनी लाईक केलं आहे.

विराट पोस्ट शेअर करत म्हणाला, ‘आम्हाला दोघांना सांगताना आनंद होत आहे, की आमच्या घरी मुलीचं आगमन झालं आहे. तुम्ही दिलेलं प्रेम आणि शुभेच्छांचे खूप आभार.’ असं म्हणत त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

शिवाय अनुष्का आणि चिमुकली दोघांची प्रकृती देखील स्थिर असल्याचं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. ११ डिसेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या तीन वर्षांनंतर या दोघांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close