तंत्रज्ञान

आधार कार्डवरील नाव-पत्ता आता घरच्या घरीच मोबाईलवरून बदला….जाणून घ्या आधार अपडेटची पद्धत

बँकेत खातं उघडण्यापासून पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्ससारख्या गरजेच्या सेवा मिळवण्यासाठी आधारकार्ड उपयोगी पडतं… पण, याच आधारकार्डावर नाव, पत्ता, लिंक, मोबाईल नंबर, जन्म दिनांक यांसारख्या विविध चुका असल्यास त्या तुम्ही स्वत: दुरुस्त करू शकाल.
तुमच्या आधारकार्डावर तुमच्या नावात, पत्त्यात किंवा आणखी माहितीत काही चुका आढळल्यास तुम्हाला आता वैताग करून घ्यावा लागणार नाहीय… कारण, आता ऑनलाईन पद्धतीनं ही प्रक्रिया होणार असल्यानं तुमचा त्रास आणि वेळ वाचणार आहे.

जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरील झालेली चूक किंवा पत्त्यात झालेली चूक दुरूस्त करायची असेल तर फार चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही स्वतः तुमच्या मोबाइलवरून यात दुरूस्ती करू शकता. UIDAI ने काही वेळेआधी आधार कार्डमध्ये सेल्फ अपडेट सर्विसला बंद केले होते. परंतु, आता पुन्हा एकदा ही सर्विस सुरू करण्यात आली आहे.

आता आपल्या आधार कार्डमध्ये केवळ नाव नव्हे तर जन्मतारीख, घराचा पत्ता, मोबाइल नंबर सुद्धा बदलता येऊ शकतो. आधार कार्डमधील आपले नाव बदलण्यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही. फक्त तुमच्या आधार कार्डमध्ये रजिस्टर नंबर असायला हवा. तसेच मोबाइलमध्ये इंटरनेट. जाणून घ्या आधार कार्डवरील काही बदल करायचा असेल तर सोपी पद्धत कोणती आहे. अवघ्या काही मिनटात आधार कार्डवरील नाव, पत्ता, बदलू शकता.

यासाठी काय करावे लागेल?

आता आपल्याला आधी आधार कार्डच्या uidai.gov.in या ऑफिशल वेबसाइट वर जायचे आहे.

होमपेजवर तुम्हाला आधी MY Aadhaar ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करा. आता तुम्हाला Update Your Aadhaar सेक्शन मध्ये जावे लागेल. या ठिकाणी तुम्हाला एक कॉलम दिसेल. Update your Demographics Data Onlineचे. यावर क्लिक करा.

यावर क्लिक करताच तुम्ही UIDAI च्या सेल्फ सर्विस अपडेट पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटवर ssup.uidai.gov.in पोहोचाल.या ठिकाणी तुम्हाला तुमचा 12 डिजिट आधार नंबरने लॉग इन करावे लागेल.

यानंतर स्क्रीनवर दिसत असलेल्या कॅप्चेला भरा. आणि सेंड ओटीपी वर क्लिक करा. यानंतर आपल्या रजिस्टर मोबाइल नंबर वर ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतर पुढील स्टेपमध्ये तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. ज्यात तुम्ही आपली वैयक्तिक माहिती, जसे, पत्ता, जन्मतारीख, नाव, जेंडर, सह अन्य माहिती भरावी लागेल.

आता तुम्हाला त्या सेक्शनला निवडावे लागेल. ज्यात तुम्हाला बदल करायचा आहे. तुमच्यासमोर नाव, जन्मतारीख, पत्ता बदल करण्याचे ऑप्शन असतील. ज्यात बदल करायचा आहे. त्यातील अपडेट नाववर क्लिक करा.या ठिकाणी नावाला अपडेट करण्यासाठी तुमच्याकडे एक आयडी प्रूफ असणे गरजेचे आहे. आयडी पुरावा म्हणून पॅन कार्ड, ड्रायविंग लायसन्स, मतदान कार्ड, रेशन कार्ड अपलोड करू शकता. सर्व डिटेल्स दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या नंबरवर एक व्हेरिफिकेशन ओटीपी येईल. त्याला व्हेरिफाय करावे लागेल. त्यांतर सेव्ह चेंज करावे लागेल.
बस्स यानंतर काहीच आठवड्यात तुमचं आधार कार्ड अपडेट होईल.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close