स्मार्टफोनद्वारे घरबसल्या अमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांसाठी काम करून पैसे मिळवण्याची सुवर्णसंधी देणारा बिझनेस.

हल्ली आपण प्रत्येक जण स्मार्टफोन वापरतो. फोटो,चॅटिंग आणि कॉलिंग साठी आपण स्मार्टफोन वापरतो परंतु हाच स्मार्टफोन आपल्या पैसा कामविण्याचे साधन झाला तर? होय हे शक्य आहे. आज लाखों स्मार्टफोनधारक आपल्या मोबाईलवरून ऑनलाईन मार्केटिंग करून रिकाम्या वेळेत दररोज हजारो रुपये कमावीत आहेत. या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे नाव आहे ऍफीलिएट मार्केटिंग.
ऍफीलिएट मार्केटिंग हा एक मार्केटिंगचा प्रकार आहे, ज्यामध्ये आपण इतर कंपन्यांच्या उत्पादनांची ऑनलाइन विक्री करून त्यातून कमिशन मिळवू शकता. यात आपण ब्रँड च्या वस्तू किंवा सेवा लोकांना विकतो आणि त्या बदल्यात ब्रँड आपल्याला काही टक्के कमिशन देते. अनेक कंपन्यांनी हि संधी उपलब्ध करून दिली असून या द्वारे सर्वसामान्य व्यक्ती ब्रँड चे प्रॉडक्ट विकून त्याद्वारे पैसे कमावु शकतो.
ऍफीलिएट मार्केटिंग कोणीही करू शकते पण ऑनलाईन पद्धतीने असलेला जनसंपर्क हा त्यासाठी प्लस पॉईंट असू शकतो.
ऍफीलिएट मार्केटिंग म्हणजे एखाद्या कम्पनीचे (इ-कॉमर्स कम्पनीचे/ डिजिटल प्रॉडक्ट) प्रॉडक्ट विक्री करून कमिशन मिळवणे.
हे कमिशन प्रत्येक प्रॉडक्ट नुसार बदलणारे असते. यात इलेक्टॉनिक्स वस्तूंसाठी वेगळे कमिशन असते, होम अप्लायन्सेस साठी वेगळे तसेच प्रत्येक कॅटेगरी साठी वेगवेगळे कमिशन ठरवलेले असते.
उदाहरणार्थ, अमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या इ- कॉमर्स कम्पनीचे प्रॉडक्ट ‘अफिलीएट मार्केटिंग’ ने प्रमोट केले जाऊ शकतात. त्या शिवाय आता प्रत्येक ऑनलाईन विक्री करणारी कम्पनी ‘ऍफीलिएट मार्केटिंग’ ने आपले प्रॉडक्ट प्रमोट करते.
या मध्ये मिळणारे कमिशन हे त्या वस्तू च्या कॅटेगरी वरती अवलंबून असते. इलेक्ट्रॉनिक्स या कॅटेगरी ला मिळणारे कमिशन हे कमी असते. याच्या तुलनेत बाकी कॅटेगरी चे कमिशन हे ५-१५ % पर्यंत असते. या वरून तुम्ही ठरवू शकता कि तुम्ही कोणत्या कॅटेगरी मधील वस्तू विक्री केल्या पाहिजेत.
या कामासाठी खूप सारे ब्लॉगर सध्या काम करत आहेत आणि ते त्या मधून त्यांच्या डिजिटल मार्केटिंग च्या माहितीतून आणि ब्लॉग च्या ट्राफिक मधून चांगले पैसे कमवत आहेत. ऍफीलिएट मार्केटिंग हि काय जादूची कांडी नाही किंवा एका रात्री मध्ये लाखो रुपये कमवता येत नाहीत यासाठी थोडा वेळ लागतो परंतु पैसे हे नक्की मिळतात. सर्वप्रथम तुम्हास तुमच्या ब्लॉग च्या विषयानुसार कोणत्या वस्तू ऍफीलिएट मार्केटिंग म्हणून विक्री केल्यास चालतील हे शोधावे लागेल त्या सोबतच त्या वस्तू पासून मिळणारे कमिशन किती हे हि तपासावे लागेल. त्या नंतर त्या ऍफीलिएट मार्केटिंग प्रोग्रॅम साठी रजिस्टर करून पुढील कार्यवाही करावी लागेल. जसे कि त्या वास्तूसाठी ची लिंक तयार करून आपल्या ब्लॉग किंवा वेबसाईट वरती लावणे. बॅनर जाहिरात असेल तर ती लावणे आणि जास्तीत जास्ती ट्राफिक आणून त्या वस्तूची विक्री करणे.जेव्हा वस्तूची विक्री होईल तेव्हा तुम्हाला त्याचे कमिशन मिळेल.
या ऍफीलिएट मार्केटिंगच्या व्यवसायाबद्दल अधिक माहिती तुम्ही गुगल आणि युट्यूबवरुन मिळवू शकता.