तंत्रज्ञान

जानेवारीपासून या मोबाईलचे व्हॉटस अप होणार बंद…. असा आहे याचा उपाय

मुंबई : व्हॉटस अप हे सध्या अतिशय लोकप्रिय असे चॅटिंग ऍप आहे. जगभरात व्हॉटस अपचे दोन अब्जहुन अधिक युजर्स आहेत. अशात व्हॉटस अप युजर्ससाठी एक धक्कादायक बातमी आहे. कारण पुढच्या वर्षीपासून काही मोबाईलमधील व्हॉट्सएप बंद होऊ शकतं. पण हे कामाचं ऍप तुम्हाला सुरु ठेवायचं असल्यास काही गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतील. व्हॉट्सएप बंद होण्याचे कारण आणि सुरु ठेवण्यासाठी काय करावं लागेल ? हे आपण जाणून घेऊया…
व्हॉट्सअप जुन्या ऑपरेटींग सिस्टिमवर बंद होणार असल्याची माहिती फेसबुकने दिली आहे. जुन्या ऑपरेटींग सिस्टमवरील एन्ड्रॉईड आणि आयओएस वर व्हॉट्सएप सपोर्ट करणार नाही. एन्ड्रॉईडच्या 4.03 व्हर्जन आणि आयफोनच्या आयओएस 9 व्हर्जनच्या सिस्टिमवर सपोर्ट करणार नाही.

iPhone 4S, iPhone 5, iPhone 5S, iPhone6 आणि iPhone 6S वापरणाऱ्या युजर्सवर याचा परिणाम होणार आहे. या स्मार्टफोनमधील जुन्या ऑपरेटींग सिस्टिमवर व्हॉट्सअप चालणार नाही.
नव्या निर्णयानंतर ४वर्जनच्या एंड्रॉईड फोन वापरकर्त्यांवर देखील परिणाम दिसेल. HTC Desire, LG Optimus Black, Motorola Droid Razr, आणि Samsung Galaxy S2 मॉडलवर याचा प्रभाव दिसणार आहे.

यासाठी आपल्याला काय करावे लागेल?
तुम्हाला यापासून वाचायचं असल्यास आपल्या फोनची ऑपरेटींग सिस्टिम अपडेट करा असे आवाहन फेसबुकनं केलं आहे. एंड्रॉईड आणि आयफोन युजर्सला आपल्या फोनमधील ऑपरेटींग सिस्टिम अपग्रेड करावी लागणार आहे. असे केल्यासच व्हॉटस अप सुरु राहणार आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close