तंत्रज्ञान

मोबाईल चोरीला गेलाय ? मग हे कराच

हरवलेला मोबाईल परत मिळवा

मोबाईल ही आज केवळ चैनीची वस्तू राहिली नसून मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. आजकाल प्रत्येक गोष्ट आपण मोबाईलच्या माध्यमातून करत असतो.

मात्र जर फोन हरवला अथवा चोरी झाल्यास, मोठी समस्या निर्माण होते. फोन शोधणे अवघड काम असते. मात्र तुम्ही आयएमईआयच्या (इंटरनेशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी) मदतीने चोरी झालेला फोन शोधू शकता.

मोबाईलच्या आयएमईआय(इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेंट आयडेन्टिटी) क्रमांकामुळे वापरकर्त्याची ओळख पटण्यास मदत होते. तसेच वापरकर्त्याचा फोन ट्रॅक करणेही या 15 आयएमईआय क्रमांकामुळे शक्‍य होते.

मोबाइल चोरीबाबत चोरीची फिर्याद घेतल्यानंतर ‘आयएमईआय’ क्रमांकाच्या आधारे पोलिस तपास करतात. हा क्रमांक सध्या कोणत्या कंपनीच्या ‘सीम कार्ड’ वर वापरला जातो याचाच शोध घेतला जातो.
मोबाइल वापरणाऱ्याकडून कॉल केल्यानंतर तो कॉल संबंधित सेवा पुरवठादार कंपनीकडे नोंदवला जातो. या नोंदणीत मोबाइलचा आयएमईआय क्रमांक दिसतो. मोबाइल क्रमांक त्यातील सिमकार्ड बदलून नवा घेता येतो. मात्र आयएमईआय क्रमांक बदलण्यासाठी संबंधित व्यक्तीकडे तांत्रिक ज्ञान व विशेष प्रणाली आवश्यक असते. आयएमईआय क्रमांक जागतिक स्तरावरील जीएसएमए ही संस्था देते. मोबाइल हरवल्यावर त्याचा शोध घेण्यासाठी वापरकर्त्याने आयएमईआय क्रमांक देणे गरजेचे आहे.

*#06# असे डायल करून आपण आपल्या मोबाईलचा आयएमइआय नंबर मिळवू शकतो.

मोबाईलचा आयएमईआय नंबर सापडल्यानंतर दुसऱ्या फोनमध्ये गुगल प्ले स्टोरवरून आयएमईआय फोन ट्रॅकर अ‍ॅप इंस्टॉल करा. अ‍ॅप इंस्टॉल केल्यानंतर आयएमईआय नंबर टाकून सर्च करा. यानंतर एका मेसेजद्वारे फोनच्या लोकेशनची माहिती मिळेल.

फोन चोरीला गेल्यास तुम्ही पोलिसात देखील तक्रार करणे गरजेचे आहे. कारण पोलीस देखील आयएमईआय नंबरद्वारेच फोन ट्रॅक करते. एक गोष्ट लक्षात ठेवा की फोन खरेदी केल्यानंतर आयएमईआय नंबर सुरक्षित लिहून ठेवा.

त्यामुळे तुम्हांला हरवलेला मोबाईल पुन्हा मिळण्यासाठी नक्कीच मदत होईल

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close