Day: February 17, 2021
-
मनोरंजन विश्व
खुशखबर: बहूप्रतिक्षित इमेल फिमेल 26 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला
पुणे : ‘ सोशल नेटवर्किंग साईटवर अनेकजण दिवसातला बराच वेळ खर्ची घालतात . या सोशल नेटवर्किंग साईट्सवरून कोणताही विषय अत्यंत…
Read More » -
पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विचार प्रबोधनपर्वाचे आयोजन
पिंपरी, दिनांक १७ फेब्रुवारी, २०२१– पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विचार प्रबोधनपर्वाचे आयोजन दि. १८ व १९ फेब्रुवारी रोजी ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले आहे. महापालिकेच्या अधिकृत फेसबुक पेज आणि यु ट्युब चॅनेल वरुन या कार्यक्रमाचे थेट प्रसारण केले जाणार असून नागरिकांनी हे कार्यक्रम घरबसल्या आवर्जुन पहावे असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन गुरुवार दि.१८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणा-या कार्यक्रमावेळी खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आण्णा बनसोडे, संग्राम थोपटे, उपमहापौर केशव घोळवे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, आयुक्त राजेश पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गुरुवार दि.१८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध वक्ते शेखर पाटील यांचे शिव चरित्र आणि आजची युवी पिढी या विषयावर व्याख्यान होणार आहे. सायंकाळी ७ वाजता शाहिर प्रसाद विभुते यांचा छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित पोवाड्यांचा कार्यक्रम होईल. शुक्रवार दि.१९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता शिवव्याख्याते तात्यासाहेब मोरे यांचे शिवचरित्रातून काय शिकावे या विषयावर व्याख्यान होणार असून शाहिर सुरेश सुर्यवंशी आसंगीकर यांचा पोवाड्यांचा कार्यक्रम संपन्न होईल. सायंकाळी ७ वाजता होणा-या मराठी पाऊल पडते पुढे या सांस्कृतिक कार्यक्रमाने प्रबोधन पर्वाची सांगता होणार आहे. www.facebook.com/pcmcindia.gov.in या फेसबुक लिंक वर तसेच pcmcindia यु ट्युब चॅनेलवर कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले आहे.
Read More » -
संस्कृती
🚩शिवछत्रपती भाग : १०३🚩 पन्हाळ्यावर कोंडाजीचा” रांगडा” पराक्रम*
पन्हाळा स्वराज्यात नसल्याची खंत शिवरायांना सतत वाटत होती. आदिलशाहीवर वचक ठेवण्यासाठी आणि कोकणच्या वाटा सुरक्षित ठेवण्यासाठी पन्हाळा ताब्यात असणे गरजेचे…
Read More »